Vijay Hazare Trophy 2022: विजय हजारे ट्रॉफी 2022 च्या अंतिम सामन्यात सौराष्ट्र आणि महाराष्ट्र संघ आमनेसामने (Saurashtra vs Maharashtra) आहेत. महाराष्ट्राने गेल्या 20 वर्षात म्हणजे 2002-03 पासून एकदाही ही स्पर्धा जिंकलेली नाही. आणि सौराष्ट्र संघ 2007-08 मध्ये चॅम्पियन ठरला. यावेळी महाराष्ट्राचा संघ दोन दशकांची प्रतीक्षा संपवू शकतो कारण याचे सर्वात मोठे कारण म्हणजे उत्कृष्ट फॉर्मात असलेला ऋतुराज गायकवाड. फायनलपूर्वी गेल्या 9 पैकी 7 सामन्यात त्याने शतक झळकावले आहे. त्याच्या नावावर आतापर्यंत 1000 च्या वर धावा झाल्या आहेत. या सामन्यात सौराष्ट्राने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे, म्हणजेच येथे महाराष्ट्र प्रथम खेळताना दिसणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे आणि भारतीय वेळेनुसार सकाळी 9:00 वाजता सुरू होणार आहे. हा सामना स्टार स्पोर्ट्स 1/HD वर थेट प्रक्षेपणासाठी उपलब्ध असेल. चाहते, ज्यांना या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहण्यात रस आहे, ते Disney+ Hotstar अॅपवर पाहु शकतात.
A look at the Saurashtra and Maharashtra's Playing XIs 🔽
Follow the match 👉 https://t.co/CGhKsFQF6g #VijayHazareTrophy | #Final | #SAUvMAH | @mastercardindia pic.twitter.com/UB59PaZjIG
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 2, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)