Lucknow Crowd Teases Gautam Gambhir: लखनौच्या विजयानंतरही कोहली-कोहलीच्या घोषणा, गौतम गंभीरची गर्दीबद्दलची ही प्रतिक्रिया व्हायरल (Watch Video)

सामन्याच्या मध्यभागी आणि सामन्यानंतर विराट कोहलीचे (Virat Kohli) चाहते लखनौच्या खेळाडूंना कोहली-कोहली.. अशा घोषणा देत सतत चिडवत होते. त्यानंतर लखनौचा मार्गदर्शक गौतम गंभीरची (Gautam Gambhir) गर्दीबद्दलची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली.

Lucknow Crowd Teases Gautam Gambhir: लखनौच्या विजयानंतरही कोहली-कोहलीच्या घोषणा, गौतम गंभीरची गर्दीबद्दलची ही प्रतिक्रिया व्हायरल (Watch Video)

आयपीएल 2023 च्या (IPL 2023) एका महत्त्वाच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने कोलकाता नाईट रायडर्सचा (LSG vs KKR) 1 धावाने पराभव केला. यासह लखनौ संघाने प्लेऑफचे तिकीट बुक केले. पण या सामन्यानंतर एक गोष्ट घडली ज्याने चर्चेत आली. सामन्याच्या मध्यभागी आणि सामन्यानंतर विराट कोहलीचे (Virat Kohli) चाहते लखनौच्या खेळाडूंना कोहली-कोहली.. अशा घोषणा देत सतत चिडवत होते. त्यानंतर लखनौचा मार्गदर्शक गौतम गंभीरची (Gautam Gambhir) गर्दीबद्दलची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली. केकेआरविरुद्धच्या शेवटच्या चेंडूवर लखनौचा संघ कसा तरी जिंकण्यात यशस्वी ठरला. मात्र या सामन्यानंतर लखनौच्या घरच्या प्रेक्षकांनी कोहली-कोहलीचा नारा सुरू केला. त्यामुळेच शेवटी गंभीरनेही चाहत्यांकडे हातवारे केले. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 21, 2023 07:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).