DC vs MI IPL 2025: आयपीएलमध्ये (IPL 2025) काल 13 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स (MI)यांच्यात सामना झाला. सामन्यात करुण नायर(Karun Nair) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांच्यात जोरदार वाद झाला. या सामन्यात करुण नायरने शानदार फलंदाजी करत फक्त 40 चेंडूत 89 धावा केल्या. त्या डावात त्याने जसप्रीत बुमराहला अनेक चौकार आणि षटकार ठोकले. या सामन्यात नायरने बुमराहविरुद्ध 9 चेंडूत 22 धावा केल्या. करुण नायरने मुंबईविरुद्ध 22 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. करुण नायरने दोन धावा घेत असताना चुकून बुमराहचा फुल टॉस बॉल ढकलला. त्यानंतर त्याने लगेच हात वर करून माफी मागितली. पण तरीही, बुमराह त्याच्यावर चिडला. त्यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये जोरदार वाद झाला. वाद पाहत कर्णधार हार्दिक पांड्याने मध्यस्थी केली. त्यानंतर करुण नायर हार्दिक पंड्याला त्याची बाजू समजावून सांगताना दिसला. हा सगळा प्रकार अकीकडे रोहित शर्मा पाहत होता. सगळ्या घटनेवर त्याने मजेदार प्रतिक्रिया दिली. त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)