IPL 2022, MI vs RCB: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) यांच्यातील आयपीएलच्या (IPL) 18 व्या सामन्यात मुंबईच्या फलंदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच राहिली. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्या अर्धशतकी खेळीने मुंबईला 151 धावांपर्यंत मजल मारून दिली. अशाप्रकारे आरसीबीला (RCB) विजयासाठी 152 धावांचे लक्ष्य मिळाले. रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी प्रत्येकी 26 धावा करत मुंबईला वेगवान सुरुवात करून दिली. 79 धावांवर सहा विकेट पडल्यावर एकावेळी मुंबई 120 धावांवर ऑलआऊट होईल असे वाटत होते, पण सूर्यकुमार मुंबईसाठी ‘संकटमोचन’ ठरला आणि त्याने 68 धावांची खेळी करून संघाला 151 धावांपर्यंत मजल मारून दिली. सूर्यकुमारने या खेळीत 5 चौकार आणि 6 गगनचुंबी षटकार ठोकले. दुसरीकडे, आरसीबीकडून हर्षल पटेल (Harshal Patel) आणि वानिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
Innings Break!
A 37-ball 68* from @surya_14kumar propels #MumbaiIndians to a total of 151/6 on the board.#RCB chase coming up shortly.
Scorecard - https://t.co/12LHg9xdKY #RCBvMI #TATAIPL pic.twitter.com/TFWeVwrEwG
— IndianPremierLeague (@IPL) April 9, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)