IPL 2022, MI vs KKR Match 14: कोलकाताने टॉस जिंकला; मुंबईची पलटन प्रथम फलंदाजी करणार, U19 स्टार Dewald Brevis याचे आयपीएल पदार्पण

IPL 2022, MI vs KKR: मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आयपीएलच्या 14 व्या सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यर याने टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यासाठी मुंबई आणि कोलकाताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही महत्वपूर्ण बदल झाले आहेत. मुंबईच्या ताफ्यात सूर्यकुमार यादव परतला आहे, तर अंडर-19 स्टार Dewald Brevis याने आयपीएल पदार्पण केले आहे.

IPL 2022, MI vs KKR Match 14: कोलकाताने टॉस जिंकला; मुंबईची पलटन प्रथम फलंदाजी करणार, U19 स्टार Dewald Brevis याचे आयपीएल पदार्पण
श्रेयस अय्यर-रोहित शर्मा (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, MI vs KKR: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यातील आयपीएलच्या (IPL) 14 व्या सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यासाठी मुंबई आणि कोलकाताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही महत्वपूर्ण बदल झाले आहेत.

मुंबईच्या ताफ्यात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) परतला आहे, तर अंडर-19 स्टार Dewald Brevis याने आयपीएल पदार्पण केले आहे. दुसरीकडे, केकेआरच्या (KKR) 11 खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) याचे पुनरागमन झाले आहे. तसेच जम्मू-काश्मीरच्या रसिक दार याने केकेआरकडून पदार्पण केले आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 06, 2022 07:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).