IPL 2022: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 15 व्या हंगामातील दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून सलामीला आलेला इशान किशन शेवटच्या चेंडूपर्यंत नाबाद राहिला. त्याने 48 चेंडूत 81 धावांची खेळी खेळली. या जोरावर मुंबईने 177 धावा केल्या. यादरम्यान पायाला मार लागल्याने भारतीय क्रिकेटपटू किशनला दुखापत झाली ज्यामुळे दिल्लीच्या डावाच्या वेळी तो मुंबई इंडियन्ससाठी विकेटकिपिंगसाठी मैदानात उतरला नाही. ईशानच्या जागी आर्यन जुयाल संघाचा पर्यायी विकेटकीपर आहे.
Ishan Kishan has had a scan on his toe & will not be keeping, Aryan Juyal comes into the side 🙌#OneFamily #MumbaiIndians #दिलखोलके #DCvMI #TATAIPL
— Mumbai Indians (@mipaltan) March 27, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)