IPL 2021: मुंबई इंडियन्सचे (Mumbai Indians) स्काऊट आणि विकेटकीपिंग सल्लागार 58-वर्षीय किरण मोरे (Kiran More) यांना कोरोनाची (Coronavirus) लागण झाल्याचे फ्रँचायझीने नुकतंच नाहीत केलं आहे. फ्रँचायझीने दिलेल्या निवेदनात म्हटले की, माजी भारतीय क्रिकेटपटू सध्या एसीम्प्टोमॅटिक असून त्यांनी स्वतःला आयसोलेट केले आहे. “मुंबई इंडियन्स आणि किरण मोरे यांनी बीसीसीआयच्या सर्व आरोग्य मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण केले आहे. मुंबई इंडियन्स वैद्यकीय टीम मोरे यांच्या आरोग्यावर नजर ठेवेल आणि बीसीसीआय (BCCI) प्रोटोकॉलचे पालन करेल. आम्ही आमच्या चाहत्यांना सुरक्षित राहण्याची आणि या कठीण परिस्थितीत कोविड-19 नियमांचे योग्यरितीने पालन करण्याची आठवण करून देतो,” फ्रँचायझीने एका निवेदनात म्हटले आहे.
Official Statement:
Mumbai Indians’ scout and wicket keeping consultant Mr. Kiran More has tested positive for Covid-19. #MumbaiIndians #MI #OneFamily (1/3) pic.twitter.com/Szoweg0MrZ
— Mumbai Indians (@mipaltan) April 6, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)