फाफ डु प्लेसिसचे (Faf du Plessis) शानदार अर्धशतक आणि मोईन अलीच्या (Moeen Ali) तुफानी फटकेबाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) आयपीएलच्या अंतिम (IPL Final) सामन्यात धावांचा डोंगर उभारला आहे. चेन्नईने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून 192 धावांपर्यंत मजल मारली आणि जेतेपदासाठी कोलकाता नाईट रायडर्सपुढे  (Kolkata Knight Riders) विशाल लक्ष्य उभे केले. सीएसकेसाठी (CSK) डु प्लेसिसने सर्वाधिक 86 धावा ठोकल्या. तर मोईन 37 धावा करून नाबाद राहिला. दुसरीकडे, केकेआरसाठी सुनील नारायणने (Sunil Narine) दोन विकेट घेतल्या. तर शिवम मावीने एक गडी बाद केला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)