भारतीय महिला क्रिकेट संघ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. उपांत्य फेरीतील रोमहर्षक लढतीत यजमान इंग्लंडचा 4 धावांनी पराभव करून किमान रौप्य पदक निश्चित केले आहे. अंतिम फेरीत टीम इंडियाचा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड सामन्यातील विजेत्या संघाशी होणार आहे. बर्मिंगहॅम येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि निर्धारित 20 षटकात 5 गडी गमावून 164 धावा केल्या आणि त्यामुळे इंग्लंडचा संघ 165 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 160 धावा करू शकला आणि 4 धावांनी सामना हरला.
Tweet
CWG 2022. India Women Won by 4 Run(s) https://t.co/9DdlO6j7vo #INDvENG #B2022
— BCCI Women (@BCCIWomen) August 6, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)