IND vs AUS T20 WC 2024 Super 8: आज टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2024) भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातला महत्वाचा सामना सेंट लुसिया येथील डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारतीय संघ या स्पर्धेत अपराजित आहे आणि हा सामना जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश करेल, तर मागील सामना गमावलेल्या ऑस्ट्रेलियासाठी हा सामना 'करो या मरो' असा आहे. तत्तपुर्वी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने 20 षटकात 205 धावा केल्या. भारताकडून कर्णधार रोहित शर्मान निडर होत 92 धावांची सर्वाधिक स्फोटक खेळी खेळली. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि स्टाइनिसला प्रत्येकी दोन-दोन विकेट मिळाल्या. ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटकात 206 धावा करायच्या आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का लागला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्कोर 153/6
Jasprit Bumrah does the trick 👏
He gets the wicket of Travis Head as Captain Rohit Sharma takes the catch 🙌
Follow The Match ▶️ https://t.co/L78hMho6Te#T20WorldCup | #TeamIndia | #AUSvIND | @Jaspritbumrah93 | @ImRo45 pic.twitter.com/GqszG4MuL6
— BCCI (@BCCI) June 24, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)