भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India South Africa Tour) दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. दरम्यान, भारतीय संघ (Team India) दक्षिण आफ्रिकेत (South Africa) दाखल झाला आहे. याचा व्हिडिओ बीसीसीआयने (BCCI) शेअर केला आहे. भारतीय क्रिकेट संघ बुधवारी सकाळी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रवाना झाला होता. भारताचा पहिला टी-20 सामना 10 डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठौर आणि त्यांचे सपोर्ट स्टाफही संघासोबत आहेत. या दौऱ्यातील टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी अनुभवी फलंदाज विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. रोहित शर्मालाही टी-20 आणि वनडेमधून विश्रांती देण्यात आली आहे. विराट आणि रोहित 20 डिसेंबरला होणार्या आंतर-संघ सामन्यापूर्वी संघात सामील होतील. (हे देखील वाचा: IND vs SA Test Series 2023: कसोटी मालिकेत रोहित शर्मा मोडू शकतो धोनीचा मोठा विक्रम, फक्त करावे लागेल हे काम)
पाहा व्हिडिओ
South Africa bound ✈️🇿🇦#TeamIndia are here 👌👌#SAvIND pic.twitter.com/V2ES96GDw8
— BCCI (@BCCI) December 7, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)