IND vs SA Test Series 2023: कसोटी मालिकेत रोहित शर्मा मोडू शकतो धोनीचा मोठा विक्रम, फक्त करावे लागेल हे काम
Rohit Sharma (Photo Credit - Twitter)

Rohit Sharma Record: भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India South Africa Tour) दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. यासाठीची टीम यापूर्वीच जाहीर करण्यात आली आहे. भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे (Rohit Sharma) सोपवण्यात आले आहे. रोहित शर्मा कसोटी मालिकेत फक्त दोन षटकार मारून मोठी कामगिरी करेल. रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी आतापर्यंत 77 षटकार ठोकले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने आणखी दोन षटकार मारले तर तो महेंद्रसिंग धोनीला (MS Dhoni) मागे टाकेल. धोनीने कसोटी क्रिकेटमध्ये 78 षटकार मारले आहेत. धोनीला मागे टाकून तो कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक षटकार मारणारा दुसरा फलंदाज ठरेल. वीरेंद्र सेहवागने भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकले आहेत. त्याने 91 षटकार मारले आहेत.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारे भारतीय खेळाडू:

वीरेंद्र सेहवाग- 91 षटकार

महेंद्रसिंग धोनी- 78 षटकार

रोहित शर्मा- 77 षटकार

सचिन तेंडुलकर- 69 षटकार

कपिल देव- 61 षटकार

कसोटी क्रिकेटमध्ये रोहित शर्माची कामगिरी

रोहित शर्माची गणना भारताच्या सर्वोत्तम खेळाडूंमध्ये केली जाते. त्याने टीम इंडियासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. त्याने 2013 मध्ये भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आतापर्यंत त्याने टीम इंडियासाठी 52 कसोटी सामन्यांमध्ये 3677 धावा केल्या आहेत ज्यात 10 शतकांचा समावेश आहे. त्याची कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम धावसंख्या 212 आहे. तो स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. (हे देखील वाचा: IND vs PAK U-19 Asia Cup 2023: क्रिकेटच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमनेसामने, जाणून घ्या कधी, केव्हा, कुठे रंगणार सामना)

कसोटी मालिकेचे वेळापत्रक:

पहिली कसोटी- 26 ते 30 डिसेंबर, सेंच्युरियन

दुसरी कसोटी – 3 ते 7 जानेवारी, केपटाऊन

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रुतुराज गायकवाड, इशान किशन (यष्टीरक्षक), केएल राहुल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार. शमी, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा