IND vs AFG T20 WC 2024 Super 8: टी-20 विश्वचषक 2024 मध्ये (T20 WorldCup 2024) आज भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. सुपर-8 मध्ये दोन्ही संघ आमनेसामने असतील. बार्बाडोसमध्ये (Kensington Oval, Bridgetown, Barbados) खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात विजय मिळवून भारताला उपांत्य फेरीतील आपला दावा मजबूत करायचा आहे. ग्रुप स्टेजमधील तीन सामने जिंकून रोहित शर्माची (Rohit Sharma) सेना येथे आली आहे, तर एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्याचवेळी अफगाणिस्तानला (Afghanistan) शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिजकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाहा दोन्ही संघ

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग.

अफगाणिस्तान (प्लेइंग इलेव्हन): रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, नजीबुल्ला जद्रान, हजरतुल्ला झाझाई, गुलबदिन नायब, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, रशीद खान (कर्णधार), नूर अहमद, नवीन-उल-हक, फजलहक फारूकी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)