रविवारी, आशिया कप 2023 चा अंतिम सामना (Asia Cup 203 Final) भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात भारताने चांगली कामगिरी करत श्रीलंकेवर 10 गडी राखून विजय मिळवला. भारताने 8व्यांदा आशिया चषक जिंकला आहे. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान 15.2 षटकात 50 धावा करून संघ ऑलआऊट झाला. प्रत्युत्तरात भारताने लक्ष्याचा पाठलाग करताना 6.1 षटकांत लक्ष्य गाठले आणि सामना 10 गडी राखून जिंकला. भारताकडून सिराजने सर्वाधिक (6) बळी घेतले, तर हार्दिक पांड्या (3) आणि बुमराह (1) यांनी फलंदाजांना आपले बळी बनवले. या विजयानंतर भारतीय चाहत्यांनी सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)