India Women's National Cricket Team vs England Women's National Cricket Team: महिला क्रिकेटमध्ये भारत महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ (India Women's National Cricket Team) आणि इंग्लंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ (England Women's National Cricket Team) यांच्यात पाच टी-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यासाठी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारत-इंग्लंड मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. जून 2025 पासून भारतीय महिला संघ आणि इंग्लंड यांच्यात मालिका खेळवली जाणार आहे. टी-20 मालिकेतील पहिला सामना 28 जून रोजी नॉटिंगहॅम येथे होणार आहे. (हे देखील वाचा: India vs England 2025 Test Series Schedule Announced: पुढील वर्षी कसोटीत भारतीय संघ भिडणार इंग्लंडशी, बीसीसीआयकडून वेळापत्रक जाहीर)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)