भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना मंगळवारी (19 डिसेंबर) खेळवला जात आहे. गकबेराह येथील सेंट जॉर्ज पार्क येथे दोन्ही संघ आमनेसामने आहेत. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जोहान्सबर्गमधील पहिला सामना भारताने आठ गडी राखून जिंकला होता. दुसरा सामना जिंकल्यास मालिकेत अजिंक्य आघाडी घेईल. दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 212 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताकडून साई सुदर्शन आणि केएल राहुलने अर्धशतके झळकावली आहे.
Innings Break!#TeamIndia are all out for 211 runs in 46.2 overs.
Sai Sudharsan top scored with the bat with 62 runs.
Scorecard - https://t.co/p5r3iTdngR #SAvIND pic.twitter.com/0qQgPgnhgT
— BCCI (@BCCI) December 19, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)