भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) हे दोन्ही संघ यावर्षी 14 ऑक्टोबर रोजी एकदिवसीय विश्वचषकात आमनेसामने येणार आहेत. त्याचवेळी पुढील वर्षी टी-20 विश्वचषक खेळवला जाणार आहे. या स्पर्धेतही दोन्ही संघांमध्ये सामना पाहायला मिळणार आहे. हा सामना कोणत्या मैदानावर खेळवला जाणार याबाबत एक मोठा अपडेट समोर आले आहे. 2024 टी-20 विश्वचषक पुढील वर्षी वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने खेळवला जाणार आहे. या स्पर्धेतही चाहत्यांना भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहायला मिळणार आहे. वृत्तानुसार, हा सामना अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात खेळवला जाणार आहे. तसेच ICC म्हणते, "डॅलस, फ्लोरिडा आणि न्यूयॉर्क हे ICC पुरुष T20 विश्वचषक 2024 चे यजमान म्हणून निश्चित झाले." ही स्पर्धा 4 जूनपासून सुरू होणार असून अंतिम सामना 30 जून रोजी होणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)