Emerging Asia Cup 2023: इमर्जिंग आशिया कप 2023 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताने बांगलादेशचा 51 धावांनी पराभव केला. यासह टीम इंडियाने या स्पर्धेत अजिंक्य राहताना अंतिम फेरी गाठली आहे. येथे त्याचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि प्रथम फलंदाजी करताना भारताने 211 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ 160 धावांवर गारद झाला. मोंडलने पाच धावा केल्या. भारतीय कर्णधार यश धुलने त्याचा झेल पकडून टीम इंडियाचा विजय निश्चित केला. (हे देखील वाचा: Asia Cup 2023: पाकिस्तानच्या माजी खेळाडूने भारताविरुद्ध ओकली गरळ! म्हणाला, 'आम्ही भारताला कुठेही हारवु शकतो')
A FIFER from Nishant Sindhu inspires India 'A' to the Final of the #ACCMensEmergingTeamsAsiaCup 👏👏
India 'A' successfully defend the total and complete a 51-run win 🙌
Scorecard - https://t.co/XnH1m6JqPM #ACC pic.twitter.com/vgRAizbXIK
— BCCI (@BCCI) July 21, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)