South Africa National Cricket Team vs India National Cricket Team, 4th T20I Match: दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ चार सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना आज (IND vs SA 4th T20I) जोहान्सबर्ग येथील वाँडरर्स स्टेडियमवर होणार आहे. तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 11 धावांनी पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत दक्षिण आफ्रिकेची कमान एडन मार्करामच्या खांद्यावर आहे. तर टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारत (प्लेइंग इलेव्हन): संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): रायन रिकेल्टन, रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, मार्को जेनसेन, जेराल्ड कोएत्झी, अँडीले सिमेलेन, केशव महाराज, लुथो सिपामला

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)