पाकिस्तान आणि श्रीलंका (PAK vs SL) यांच्यातील आशिया चषक (Asia Cup 2022) सुपर फोरचा शेवटचा सामना आजपासून दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर थोड्यावेळात खेळवला जाणार आहे. दरम्यान, पाकिस्तानविरुद्धच्या सुपर फोरच्या अखेरच्या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आशिया कप फायनलपूर्वी दोन्ही संघांसाठी हा सराव सामना आणि मिनी फायनलसारखा आहे. तसेच पाकिस्तानचा शादाब खान आणि नसीम शाह हा सामना खेळत नाहीत. त्यांच्या जागी संघाने उस्मान कादिर आणि हसन अलीला संधी दिली आहे. आसिथा फर्नांडोच्या जागी प्रमोद मदुशानी श्रीलंकेसाठी पदार्पण करणार आहे. अस्लंकाच्या जागी धनंजय डी सिल्वाचा संघात समावेश करण्यात आला आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
पाकिस्तान : मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), बाबर आझम (क), फखर जमान, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, आसिफ अली, मोहम्मद नवाज, उस्मान कादिर, हरिस रौफ, मोहम्मद हसनैन, हसन अली
श्रीलंका : पथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), धनंजया डी सिल्वा, दनुष्का गुनाथिलका, भानुका राजपक्षे, दासुन शनाका (क), वनिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, प्रमोद मदुशन, महेश थेक्षना, दिलशान मदुशानका
🏏 Sri Lanka win the toss and opt to field first 🏏
Two changes to our playing XI 👇#AsiaCup2022 | #SLvPAK pic.twitter.com/4GQSCMp7kP
— Pakistan Cricket (@TheRealPCB) September 9, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)