ICC Stop Clock Rule: आयसीसी (ICC) आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणखी एक नवीन नियम आणणार आहे. ज्यासाठी आयसीसीने पूर्ण तयारी केली आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-20 मालिकेत आयसीसी हा नियम लागू करणार आहे. होय, आम्ही स्टॉप क्लॉक नियमाबद्दल बोलत आहोत. इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज मालिकेत आयसीसी या नियमाची चाचणी घेईल. या नियमानुसार, गोलंदाजी करणाऱ्या संघाला षटक संपल्यानंतर 60 सेकंदांच्या आत पुढील षटक टाकावे लागेल. म्हणजेच षटक संपल्यानंतर गोलंदाजी करणाऱ्या संघाला पुढील षटक 60 सेकंदात सुरू करावे लागणार आहे. परंतु एका डावात तिसऱ्यांदाही गोलंदाज संघ निर्धारित वेळेत षटक सुरू करू शकला नाही, तर त्याला शिक्षा होईल. याअंतर्गत पाच धावांचा दंड आकारण्यात येणार आहे. मात्र, याआधी गोलंदाजी करणाऱ्या संघालाही दोनदा इशारा दिला जाईल. त्यानंतरच दंडात्मक कारवाई केली जाईल. (हे देखील वाचा: ICC Player of the Month: ट्रॅव्हिस हेडने जिंकला आयसीसीचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार, ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद शमीला केले पराभूत)
🚨 England have announced their squad for the #INDvENG Test series begining in January 2024
🏏 Four specialist spinners in the squad
✅ Foakes recalled, Pope and Leach return
❌ Woakes, Lawrence, Jacks and Dawson won't feature pic.twitter.com/PciY1ixtkv
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) December 11, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)