IND vs ENG 2nd Test: भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध दुसरा कसोटी सामना खेळत आहे. या सामन्यात टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली होती. जेव्हा रोहित शर्मा (Rohit Sharma) अवघ्या 14 धावा करून बाद झाला. मात्र युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने (Yashasvi Jaiswal) शानदार फलंदाजी करत द्विशतक झळकावले. त्याने इंग्लंडविरुद्ध 209 धावा केल्या, ज्यात 19 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता. आता या द्विशतकानंतर यशस्वी जैस्वालची पहिली प्रतिक्रिया आली आहे. बीसीसीआयने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये यशस्वी जैस्वाल असे म्हणताना दिसत आहे, “मी प्रत्येक चेंडूचा आनंद लुटला आणि तिथे जाऊन स्वतःला व्यक्त करणे चांगले वाटले. कसे समजावू, माझ्याकडे फारसे शब्द नाहीत. मी फक्त माझ्या खेळीचा आनंद घेतला आणि मी खूप आनंदी आहे. मी हे शतक मोठे करण्याचा विचार करत होतो आणि जेव्हा मी द्विशतक झळकावले तेव्हा मला जाणवले की मी त्याचा आनंद लुटला. मला हा क्षण साजरा करायचा आहे आणि त्याचा आनंद घ्यायचा आहे.”

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)