आशिया चषक 2022 च्या शेवटच्या साखळी टप्प्यातील सामन्यात हाँगकाँगचा कर्णधार निझाकत खानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघ कोणताही बदल न करता खेळण्यासाठी उतरले आहेत. आशिया चषक 2022 मध्ये, ग्रुप स्टेजचा शेवटचा सामना पाकिस्तान आणि हाँगकाँगमध्ये खेळला जात आहे. श्रीलंकेने गुरुवारी बांगलादेशचा पराभव करून सुपर-4 साठी पात्रता मिळवली, तर पाकिस्तान आणि हाँगकाँग यांच्यातील आजचा सामना जिंकणारा संघ सुपर-4मध्ये पोहोचणारा शेवटचा संघ असेल आणि रविवारी त्यांचा सामना भारताशी होईल.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन:

पाकिस्तान: मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, शादाब खान, आसिफ अली, मोहम्मद नवाज, हरिस रौफ, नसीम शाह, शाहनवाज दहनी

हाँगकाँग: निजाकत खान (कर्णधार), यासीम मोर्तझा, बाबर हयात, किंचित शाह, एजाज खान, झीशान अली, स्कॉट मॅकेनी (विकेटकीपर), हारून अर्शद, एहसान खान, आयुष शुक्ला, मोहम्मद गझनफर

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)