टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज अहमदाबादमध्ये खेळला जात आहे. दुसरा सामना जिंकून टीम इंडियाने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. भारतीय संघाने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टी-20 मालिकेत प्रवेश केला आहे. टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावून 234 धावा केल्या. टीम इंडियासाठी सलामीवीर शुभमन गिलने सर्वाधिक नाबाद 126 धावा केल्या. न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेल, मायकेल ब्रेसवेल, ब्लेअर टिकनर आणि ईश सोधीने प्रत्येकी एक विकेट घेतली. हा सामना जिंकण्यासाठी न्यूझीलंडला 20 षटकात 235 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाला तिसरा मोठा झटका बसला. न्यूझीलंडचा स्कोर 7/3.
3RD T20I. WICKET! 1.1: Devon Conway 1(2) ct Hardik Pandya b Arshdeep Singh, New Zealand 4/2 https://t.co/cBSCfiMLOa #INDvNZ @mastercardindia
— BCCI (@BCCI) February 1, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)