India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team: भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. (IND vs BAN T20I Series 2024) पहिला सामना ग्वाल्हेरच्या श्रीमंत माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. टीम इंडियाची कमान सूर्यकुमार यादवच्या (SuryaKumar Yadav) खांद्यावर आहे. त्याचबरोबर नजमुल हुसेन शांतो (Najmul Hossain Shanto) बांगलादेशचे नेतृत्व करत आहे. त्याआधी भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने या सामन्यात मयंक यादव आणि नितीश कुमार रेड्डी यांना पदार्पणाची संधी दिली आहे. दरम्यान, प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या बांगालेदशला पाचवा धक्का लागला आहे. बांग्लादेशचा स्कोर 40/5
Through the gates!
Make that 2⃣ for Varun Chakravarthy 👊
Bangladesh 5⃣ down in the 10th over.
Live - https://t.co/Q8cyP5jXLe#TeamIndia | #INDvBAN | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/yvCmfEP7nB
— BCCI (@BCCI) October 6, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)