आयपीएल 2023 (IPL 2023) च्या 70व्या म्हणजेच शेवटच्या साखळी सामन्यात, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघ गुजरात टायटन्सकडून (RCB vs GT) पराभूत होऊन प्लेऑफच्या शर्यतीतून बाद झाला. हा सामना बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. पावसामुळे सामना सुरू होण्यास उशीर झाला. गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने गेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा आठ विकेट्सने पराभव केला होता. अशाप्रकारे आरसीबीच्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सला प्लेऑफचे तिकीट मिळाले आहे. प्रथम खेळताना आरसीबीने 20 षटकांत 5 गडी गमावून 197 धावा केल्या. विराट कोहलीने या सामन्यात 61 चेंडूत नाबाद 101 धावा केल्या आणि सलग दुसरे शतक ठोकले. त्याचे आयपीएल कारकिर्दीतील हे सातवे शतक ठरले. त्याला अनुज रावतने साथ दिली, त्याने 15 चेंडूत नाबाद 23 धावा केल्या आणि त्यामुळेच आरसीबीची धावसंख्या 197 पर्यंत पोहोचली. फाफ डू प्लेसिसने 28 आणि मायकेल ब्रेसवेलने 26 धावा करून महत्त्वपूर्ण योगदान दिले. गोलंदाजीत राशिद खान आणि मोहम्मद शमीने 1-1 विकेट घेतली. दुसरीकडे नूर अहमदने दोन यश आपल्या नावावर केले.
The 𝗠𝗨𝗠𝗕𝗔𝗜 𝗜𝗡𝗗𝗜𝗔𝗡𝗦 have qualified for the #TATAIPL playoffs 🙌
Congratulations to the @mipaltan 👏🏻👏🏻 pic.twitter.com/Y4Gj4C5qB0
— IndianPremierLeague (@IPL) May 21, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)