इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामातील 30वा सामना आज लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना लखनौचे होम ग्राऊंड भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. लखनौने यावर्षी चांगली कामगिरी केली आहे. लखनौ संघाने 6 पैकी 4 सामने जिंकले असून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, गुजरातने पाचपैकी तीन सामने जिंकले असून गुणतालिकेत चौथ्या स्थानावर कायम आहे. दोन्ही संघांचा नेट रनरेट खूप चांगला आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या गुजरात टायटन्स संघाने निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 135 धावा केल्या. गुजरात टायटन्सकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक 66 धावा केल्या आहेत. लखनौ सुपर जायंट्सकडून कृणाल पंड्या आणि मार्कस स्टॉइनिसने प्रत्येकी दोन बळी घेतले. लखनौ सुपर जायंट्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटकात 136 धावा करायच्या आहेत.
Match 30. WICKET! 19.6: David Miller 6(12) ct Deepak Hooda b Marcus Stoinis, Gujarat Titans 135/6 https://t.co/TtAH2CiXVI #TATAIPL #LSGvGT #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)