WPL 2023 च्या तयारीसाठी सर्व संघ जमले आहेत. दरम्यान, गुजरात जायंट्स संघाने पहिल्या सत्रासाठी आपल्या कर्णधाराची घोषणा केली आहे. WPL च्या पहिल्या सत्रात एकूण पाच संघ स्पर्धा करतील. 4 मार्चपासून सुरू होणाऱ्या या हंगामासाठी सर्व संघांनी सराव सुरू केला आहे. WPL चे सर्व सामने मुंबईत (Mumbai) होणार आहेत. मोसमातील पहिल्या सामन्यात गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स हे संघ आमनेसामने असतील. दरम्यान, गुजरात जायंट्सच्या संघाने विश्वचषक विजेत्या खेळाडूला आपला कर्णधार बनवले आहे. गुजरात जायंट्सच्या संघाने WPL च्या पहिल्या सत्रासाठी बेथ मुनीची कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. बेथ मुनी (Beth Mooney) ही हुशार खेळाडू असून तिच्या नेतृत्वाखाली संघ चांगली कामगिरी करेल. ऑस्ट्रेलियाकडून खेळणाऱ्या बेथ मुनीने नुकताच महिला टी-20 विश्वचषक जिंकला आहे. तिने महिला टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात 53 चेंडूत नाबाद 74 धावा केल्या. तिच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियन संघाने अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. या खेळीसाठी तिला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)