Champions Trophy 2025 Teaser: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 19 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. यावेळी पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करत आहे. स्पर्धेतील पहिला सामना यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाईल. आता आयसीसीने या स्पर्धेचा एक छोटासा टीझर प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये 5 खेळाडू दिसत आहेत. यावेळी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये 8 संघ सहभागी होत आहेत. ज्याबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) एक टीझर जारी केला आहे. या टीझरमध्ये पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी आणि शादाब खान हे प्रथम दाखवले आहेत. टीझरमध्ये हार्दिक पंड्या दाखवण्यात आला आहे. याशिवाय टीझरमध्ये इंग्लंडचा फिल साल्ट आणि अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी हे देखील दाखवण्यात आले आहेत. टीझरमध्ये हे सर्व खेळाडू ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
ICC Champions Trophy Promo is out. Hardik Pandya, Phil Salt, Mohammed Nabi, Shaheen Afridi & Shadab Khan in the promo.#ICC pic.twitter.com/1UOR9hydQN
— Gaurav Gulati (@gulatiLFC) January 22, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)