मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स (MI vs GT) मंगळवार, 26 एप्रिल रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल 2023 च्या 35 व्या सामन्यात आमनेसामने होते. या सामन्यात गतविजेत्या गुजरातने मुंबईचा 55 धावांच्या फरकाने पराभव केला. दरम्यान, या सामन्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू आणि माजी दिग्गज भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा (Arjun Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकर नाकात बोट घालताना दिसत आहे आणि मग तोंडात. आजचे कॅमेरामन खूप चपळ झाले आहेत हे कदाचित अर्जुनला माहीत नसावे. अर्जुनचा हा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागला आणि चाहत्यांनी त्याची आणि सचिनची प्रचंड खिल्ली उडवली….
पहा व्हिडिओ
Original Video pic.twitter.com/oY9LPrUtXj
— Chanakya (@ChanakyaSG) April 26, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)