भारतात खेळल्या जाणाऱ्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाचा 20वा (ICC Cricket World Cup 2023) सामना इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका (ENG vs SA) यांच्यात खेळला जात आहे. या जगात इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ अपसेटचे बळी ठरले आहेत. अफगाणिस्तानने इंग्लंडला दणदणीत पराभव दिला. तर दक्षिण आफ्रिकेचा नेदरलँड्सकडून पराभव झाला. आता विश्वचषकात दोन्ही संघ विजयी होऊन उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्याचे लक्ष्य ठेवणार आहेत. हा सामना जिंकणे इंग्लंडसाठी खूप महत्त्वाचे आहे. येथील पराभवामुळे इंग्लंडचा उपांत्य फेरीचा मार्ग अशक्य होऊ शकतो. दरम्यान, इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाला सामन्यापूर्वी दुखापत झाली. तो या सामन्यात खेळत नाही.

दोन्ही संघांची प्लेइंग-11

दक्षिण आफ्रिका : क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, कागिस रबाडा, लुंगी एनगिडी.

इंग्लंड : जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, जोस बटलर (विकेटकीपर/कर्णधार), डेव्हिड विली, आदिल रशीद, गस एटिनसन, मार्क वुड, रीस टोपली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)