England National Cricket Team vs Sri Lanka National Cricket Team, Day 1 Tea Break Scorecard: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (England National Cricket Team) आणि श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ (Sri Lanka National Cricket) यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्याला शुक्रवारपासून लंडनमधील केनिंग्टन ओव्हल स्टेडियमवर खेळला जात आहे. इंग्लंडने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंड संघाचे नेतृत्व ऑली पोप करत आहेत तर श्रीलंकेचे नेतृत्व धनंजय डी सिल्वा करत आहे. त्याआधी, श्रीलंकेचा कर्णधार धनंजय डी सिल्वाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लडंकडून कर्णधार ऑली पोपने शतक झळकावले आहे. तर बेन डकेट 86 धावा करुन बाद झाला आहे. श्रीलंकेकडून लाहिरु कुमारने 2 आणि मिलन प्रियनाथ रथनायकेने 1 विकेट घेतली आहे. दरम्यान चाहते या सामन्याचा आनंद स्टार स्पोर्टस आणि सोनी लिव्ह पाहून घेऊ शकतात.
Century for the Pope 💯
Duckett's flying start 🦆
Highlights from Day 1 at the Kia Oval 👇 pic.twitter.com/oTrRW23GkC
— England Cricket (@englandcricket) September 7, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)