England's Playing XI for the first Test: इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 21 ऑगस्टपासून खेळवला जाणार असून या सामन्यासाठी इंग्लंडने आपली प्लेइंग 11 ची घोषणा केली आहे. या तीन कसोटी सामन्यांसाठी हॅरी ब्रूककडे संघाचे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे, तर बेन स्टोक्सच्या अनुपस्थितीत ऑली पोप संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. ब्रूक वेस्ट इंडिजविरुद्धच्या इंग्लंड कसोटी संघात परतला असून या कसोटी मालिकेत तो ऑली पोपचा सहाय्यक असेल. श्रीलंकेविरुद्धच्या या कसोटी मालिकेत संघाचा नियमित कर्णधार बेन स्टोक्स नाही, तर संघाचा सलामीवीर फलंदाज जॅक क्रॉली हाही दुखापतीमुळे कसोटी संघाबाहेर आहे. डॅन लॉरेन्स आता जॅकच्या जागी सलामीची जबाबदारी पार पाडणार असून तो बेन डकेटसह डावाची सुरुवात करणार आहे.
पहिल्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडची प्लेईंग इलेव्हन
डॅन लॉरेन्स, बेन डकेट, ऑली पोप (कर्णधार), जो रूट, हॅरी ब्रूक (उपकर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, मॅथ्यू पॉट्स, मार्क वुड, शोएब बशीर.
JUST IN: England name their XI for the first Test against Sri Lanka at Old Trafford 🏴
Matthew Potts returns to the side for the first time since June 2023; Harry Brook has been named as Ollie Pope's vice-captain for the series #ENGvSL pic.twitter.com/yune9SZr8p
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) August 19, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)