England National Cricket Team vs Sri Lanka National Cricket Team 3rd Test: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (England National Cricket Team) विरुद्ध श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ (Sri Lanka National Cricket Team) यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना 6 सप्टेंबरपासून खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील तिसरा कसोटी सामना लंडनमधील केनिंग्टन ओव्हल स्टेडियमवर दुपारी 3.30 वाजता खेळवला जाईल. दुसऱ्या कसोटीत इंग्लंड संघाने श्रीलंकेचा 190 धावांनी पराभव केला. यासह इंग्लंडने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. यासाठी इंग्लंडने आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. ऑली पोप इंग्लंडचे नेतृत्व करताना दिसणार आहे. इंग्लंडने युवा जोश हलचा समावेश प्लेइंग इलेव्हनमध्ये केला आहे. जोश हल या सामन्यातून कसोटी पदार्पण करणार आहे. मॅथ्यू पॉट्सच्या जागी जोश हलची संघात निवड करण्यात आली आहे.
तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन: बेन डकेट, डॅनियल लॉरेन्स, ऑली पोप (कर्णधार), जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, जोश हल, ऑली स्टोन आणि शोएब बशीर.
England named their playing Xl for the third test vs England
Pacer Josh Hull will make his test debut #JoshHull #OlliePope #JoeRoot #ENGvsSL #ENGvSL #Tests #WTC2025 #Cricket #SBM pic.twitter.com/TGciaRPn0q
— SBM Cricket (@Sbettingmarkets) September 4, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)