England National Cricket Team vs Sri Lanka National Cricket Team 2nd Test: आजपासून म्हणजेच 29 ऑगस्टपासून इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (England National Cricket Team) आणि श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ (Sri Lanka National Cricket Team) यांच्यात कसोटी मालिकेतील दुसरा सामना लंडनमधील लॉर्ड्स स्टेडियमवर (Lords Stadium) खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 पासून खेळवला जाईल. ऑली पोप इंग्लंड संघाचे नेतृत्व करताना दिसणार असून श्रीलंकेचे नेतृत्व धनंजय डी सिल्वा करणार आहे. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून जिंकला होता. तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड संघाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. अशा स्थितीत श्रीलंकेचा संघ पुनरागमन करण्याच्या इराद्याने मालिकेत उतरणार आहे. दरम्यान, श्रीलंकाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच भारतातील चाहते या सामन्याचा आनंद सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर आणि सोनी लाइव्ह ॲपवर सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंगचा आनंद घेवू शकतात.
A solid fight from Sri Lanka but the hosts eventually prevailed in #ENGvSL 1st Test 🤜🤛
Will Dhananjaya's Lankan Lions 🦁 manage to restore parity at Lord's? 🏏🏟️
Stream the vital 2nd Test - 29th Aug, 3:30 PM onwards, LIVE on #SonyLIV! pic.twitter.com/9Qj4qIPL1x
— Sony LIV (@SonyLIV) August 29, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)