एकदिवसीय विश्वचषकापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. पहिला सामना 22 सप्टेंबरला होणार आहे. एकदिवसीय विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची आहे. पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघाची कमान केएल राहुलकडे आहे. ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्स आहे. पण आता एकदिवसीय सामन्यापूर्वीच ऑस्ट्रेलियन संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. त्याचे दोन स्टार खेळाडू पहिल्या एकदिवसीय सामन्यात खेळू शकणार नाहीत. पॅट कमिन्सने पत्रकार परिषदेत सांगितले की, या मालिकेसाठी आपण तिन्ही सामने खेळण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत. पण ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल स्टार्क भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात खेळू शकणार नाहीत. यामुळे ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. हे दोन्ही खेळाडू ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय विश्वचषक संघाचा भाग आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आणि अॅशेस सीरिजदरम्यान स्टार्कला पाठदुखीचा त्रास झाला होता. तो अजूनही जखमी आहे.
Australia team updates for the first ODI vs India:
- Starc & Maxwell not available.
- Cummins is hoping to play all the games.
- Smith is fit & ready. pic.twitter.com/gZwVxSiI6I
— Johns. (@CricCrazyJohns) September 21, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)