भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकला टी-20 विश्वचषकानंतर संघात स्थान मिळालेले नाही. त्यानंतर तो आता आयपीएल 2023 मध्ये आरसीबीकडून खेळताना दिसणार आहे. मात्र त्याआधी तो आपले जुने काम करताना दिसणार आहे. वास्तविक, कार्तिक 9 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये कॉमेंट्री करताना दिसणार आहे. त्याच वेळी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत कार्तिक कॉमेंट्री करण्यासाठी डीके खूप उत्सुक दिसत आहे. यासंदर्भातील एक पोस्ट त्यांनी ट्विटरवर शेअर केली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)