DC vs RCB, TATA IPL 2025 46th Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 46 वा सामना आज म्हणजेच 27 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (DC vs RCB) यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जात आहे. या हंगामात, आरसीबीचे नेतृत्व रजत पाटीदार करत आहे. तर, दिल्ली कॅपिटल्सची कमान अक्षर पटेलच्या खांद्यावर आहे. या हंगामात दोन्ही संघांची कामगिरी आतापर्यंत उत्कृष्ट राहिली आहे. त्यामुळे आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असणार आहे. दरम्यान, बंगळुरुने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल, करुण नायर, केएल राहुल (विकेटकीपर), अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, विपराज निगम, मिचेल स्टार्क, दुष्मंथा चमीरा, कुलदीप यादव, मुकेश कुमार
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, जेकब बेथेल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), टीम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, रोमॅरियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, सुयश शर्मा, जोश हेजलवुड, यश दयाल
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)