‘Dance Deewane 3’ शोमध्ये आसामी स्पर्धकावर वर्णद्वेषी टिप्पणीवर क्रिकेटपटू Riyan Parag ने घेतला आक्षेप, अशा शब्दात व्यक्त केली निराशा, पहा Tweet
डान्स दिवाने 3 मधील होस्ट राघव जुयालची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. व्हिडिओ क्लिपमध्ये राघव गुंजन सिंह नावाच्या स्पर्धकावर वर्णद्वेषी टिप्पणी करताना दिसत आहे. यावर क्रिकेटपटू रियान परागने या घटनेवर आक्षेप व्यक्त केला आहे. व्हिडिओमध्ये राघव आसाममधील गुंजन संदर्भात ‘मोमो’, ‘चौमीन’ असे शब्द वापरताना दिसत आहे.
वंशवाद (Racism) ही जगभर एक प्रचलित समस्या आहे. रंग, जात, पंथ किंवा इतर स्वरूपाच्या आधारावर भेदभावाची प्रकरणे अनेकदा समोर येतात. अशीच एक घटना डान्स दिवाने 3 या लोकप्रिय डान्स शोच्या एका भागादरम्यान पाहायला मिळाली. शोचा होस्ट राघव जुयालने (Raghav Juyal) आसाममधील स्पर्धक गुजन सिंग विरुद्ध वर्णद्वेषी टिप्पण्या केल्याचा आरोप केला जात आहे. ही क्लिप जुन्या एपिसोडची आहे कारण जुयालने शो सोडला आहे.
Assam is very much in India as any other state. No hate to this man but these comparisons need to stop. Jai Hind. Joi Axom. 🇮🇳 https://t.co/pbgZRp2kCb
— Riyan Parag (@ParagRiyan) November 15, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 16, 2021 06:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

