Team India Victory Parade: टी-20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद पटकावल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ दिल्लीहून मुंबईत पोहोचला आहे. मुंबईच्या नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत ओपनडेक बसमध्ये भारतीय संघाची विजयी मिरवणुक निघणार आहे. या कार्यक्रमासाठी खेळाडू विमानतळावरून मरीन ड्राईव्हकडे मार्गस्थ झाले आहेत. मरीन ड्राईव्हवर खेळाडूंचे जंगी स्वागत करण्यासाठी लाखोंच्या संख्येने एकत्र आले आहेत. दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी जमलेल्या क्रिकेट प्रेमींच्या गर्दींचे नियत्रण करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना निर्देश दिले आहेत. विजयवीर संघाच्या स्वागतासाठी वानखेडे स्टेडियम तसेच नरीमन प्वाईंट ते स्टेडियम दरम्यान, मरिन ड्राईव्ह या परिसरात मोठी गर्दी झाली आहे. या गर्दीमुळे वाहतुक विस्कळीत होऊ नये तसेच जमलेल्या क्रिकेट प्रेमींचीही गैरसोय होऊ नये याकडे मुंबई पोलीस दल आणि संबंधित यंत्रणांनी लक्ष पुरवावे, अनुषांगिक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दुरध्वनीद्वारे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना दिल्या आहेत.
Maharashtra CM Eknath Shinde has given directions to the Mumbai Police Commissioner to ensure that there is no mismanagement of traffic or inconvenience to the Indian Cricket Fans gathered at Marine drive and Wankhede Stadium. Police are directed by CM to ensure proper crowd and… pic.twitter.com/EAGi1CmdFH
— ANI (@ANI) July 4, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)