आयपीएल 2023 (IPL 2023) च्या त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात, मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबाद (MI vs SRH) चा 8 गडी राखून पराभव केला. या विजयासह मुंबईने प्लेऑफमध्ये खेळण्याच्या आशाही जिवंत ठेवल्या आहेत. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने 20 षटकांत 5 गडी गमावून 200 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सने षटकांत 2 गडी गमावून सामना जिंकला. मुंबईकडून कॅमेरून ग्रीन आणि रोहित शर्माने 37 चेंडूत 56 धावा केल्या. सनरायझर्सकडून भुवनेश्वर कुमार आणि मयंक डागर यांनी 1-1 विकेट घेतली. 201 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी रोहित शर्मा आणि इशान किशन सलामीला आले. 20 धावांच्या स्कोअरवर मुंबईने पहिली विकेट गमावली. भुवनेश्वर कुमारने इशान किशनला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. किशन 12 चेंडूत 14 धावा करून बाद झाला. यानंतर रोहित शर्मा 37 चेंडूत 56 धावा करून बाद झाला. मयंक डागरने त्याला आपला बळी बनवले.
Match 69. Mumbai Indians Won by 8 Wicket(s) https://t.co/vJfkI6nj57 #TATAIPL #MIvSRH #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 21, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)