MS Dhoni-Pant With Abdu Rozik: एमएस धोनी (MS Dhoni) सध्या दुबईमध्ये (Dubai) आहे, जिथे तो आपल्या कुटुंबासह नवीन वर्ष (Happy New Year 2024) साजरे करणार आहे. महेंद्रसिंग धोनीसोबतच भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतही (Rishabh Pant) दुबईत नवीन वर्ष साजरे करणार आहे. शनिवारी, ताजिकिस्तानी गायक आणि सोशल मीडिया व्यक्तिमत्व अब्दू रोजिक (Abdu Rozik) यांनी दुबईत धोनी आणि पंत यांची भेट घेतली. या भेटीचा फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. माही खूप आधी साक्षी आणि तिची मुलगी झिवासोबत दुबईला पोहोचला होता. 17 किंवा 18 डिसेंबरच्या सुमारास तो दुबईला आला होता, तो येथे नवीन वर्ष साजरा करणार आहे. आयपीएल लिलावाच्या वेळी ऋषभ पंतही दुबईला पोहोचला होता, तोही पहिल्यांदाच लिलावात बसला होता. बिग बॉस फेम अब्दू रोगिकने शनिवारी दुबईत धोनी पंतची भेट घेतली, ज्याचा फोटो त्याने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला. (हे देखील वाचा: Shardul Thakur Injured: भारताला मोठा धक्का, नेटमध्ये फलंदाजी करताना शार्दुल ठाकूरच्या खांद्याला झाली दुखापत)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)