Abdu Rozik Calls Off Wedding to Amira: अब्दु रोजिकने मोडले अमीरासोबतचे लग्न; पाच महिन्यांपूर्वी झाला होता साखरपुडा, सांस्कृतिक मतभेदांमुळे घेतला निर्णय
पाच महिन्यांपूर्वी म्हणजेच एप्रिलमध्ये अब्दूने त्याच्या लग्नाची घोषणा केली होती. 20 वर्षांचा अब्दू 7 जुलै रोजी 19 वर्षांच्या अमीरातीशी विवाह करणार होता.
Abdu Rozik Calls Off Wedding to Amira: बिग बॉस 16 फेम अब्दू रोजिकशी संबंधित एक बातमी समोर आली आहे. अब्दूने साखरपुड्यानंतर 4 महिन्यांनंतरच आपले लग्न मोडले आहे. पाच महिन्यांपूर्वी म्हणजेच एप्रिलमध्ये अब्दूने त्याच्या लग्नाची घोषणा केली होती. 20 वर्षांचा अब्दू 7 जुलै रोजी 19 वर्षांच्या अमीरातीशी विवाह करणार होता. पण आता त्याने आपले लग्न रद्द झाल्याचे सांगितले. अब्दु रोजिक हा इंटरनेट सेन्सेशन आणि कझाकिस्तानचा प्रसिद्ध गायक आहे. या वर्षी एप्रिलमध्ये अब्दूने सोशल मीडियावर एंगेजमेंट रिंग दाखवणारा एक व्हिडिओ शेअर केला होता आणि तो अमीरासोबत लग्न करणार असल्याचे सांगितले होते. पण आता इंडिया फोरमला दिलेल्या मुलाखतीत अब्दूने हे लग्न रद्द केल्याचे सांगितले. त्यामागचे कारण म्हणजे दोघांमधील सांस्कृतिक फरक, असल्याचे त्याने नमूद केले. अब्दू म्हणाला, मी माझे लग्न रद्द केल्याचे जाहीर करताना मला खूप वाईट वाटत आहे. सांस्कृतिक फरकामुळे मी हा निर्णय घेतला आहे. (हेही वाचा: Siddharth and Aditi Rao Hydari Tie the Knot: अभिनेत्री आदिती राव हैदरी आणि अभिनेता सिद्धार्थने केले लग्न, अभिनेत्रीने शेअर केले लग्न सोहळ्याचे फोटो)
अब्दु रोजिकने मोडले अमीरासोबतचे लग्न-
#AbduRozik, a former #BiggBoss16 contestant, has called off his wedding with Amira citing cultural differences
He stressed the need for a mentally resilient partner and expressed gratitude for his supporters' unwavering support pic.twitter.com/kwZDmGPFjP
— Pune Times (@PuneTimesOnline) September 18, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 18, 2024 06:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

