पाकिस्तानविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यापूर्वी न्यूझीलंड क्रिकेट संघाला(New Zealnd Cricket Team) मोठा झटका बसला आहे. संघाचा अनुभवी सलामीवीर डेव्हॉन कॉनवे (Devon Conway) या सामन्यातून बाहेर पडला आहे. कॉनवे कोरोना पॉझिटिव्ह आढळला असून या कारणास्तव तो यापुढे या सामन्याचा भाग असणार नाही. त्याच्या जागी चॅड बोवेसचा कव्हर म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. डेव्हॉन कॉनवे व्यतिरिक्त, गोलंदाजी प्रशिक्षक आंद्रे अॅडम्स देखील कोविड पॉझिटिव्ह आढळले आहेत आणि ते देखील चौथ्या टी -20 चा भाग असणार नाहीत. डेव्हॉन कॉनवे आणि आंद्रे अॅडम्स या दोघांनाही कोविड पॉझिटिव्ह आढळल्यानंतर क्राइस्टचर्च हॉटेलमध्ये एकाकी ठेवण्यात आले आहे. कॉनवेची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली तरच तो पाचव्या आणि शेवटच्या टी-20 मध्ये खेळू शकेल. याआधी संघाचा अनुभवी फिरकी गोलंदाज मिचेल सँटनरही कोरोनाचा बळी ठरला होता आणि त्यामुळे त्याला पहिल्या टी-20 सामन्यातून बाहेर व्हावे लागले होते. (हे देखील वाचा: How To Watch ICC U19 World Cup 2024 Live Streaming: आजपासून आयसीसी अंडर-19 क्रिकेटचा महाकुंभ सुरु, जाणून घ्या कधी अन् कुठे घेणार सामन्याचा आनंद)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)