भारतीय दौरा ऑस्ट्रेलियन संघासाठी दिवास्वप्न ठरत आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये (Border-Gavaskar Trophy 2023) ऑस्ट्रेलियन संघ 0-2 ने पिछाडीवर आहे. डेव्हिड वॉर्नर आणि जोश हेझलवूड दुखापतीमुळे आधीच बाहेर गेले आहेत. कौटुंबिक समस्यांमुळे कर्णधार पॅट कमिन्स मायदेशी परतला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. आता संघाचा आणखी एक प्राणघातक खेळाडू मायदेशी परतला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार फिरकीपटू अॅश्टन अगर (Ashton Agar) वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडून खेळण्यासाठी भारत सोडून गेला आहे. तो घराकडे निघाला आहे. तो शेफिल्ड शील्ड आणि मार्श कप फायनलमध्ये खेळण्यासाठी उपलब्ध असेल. भारत दौऱ्यावर अॅश्टन बेंचवर राहिला. त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. या कारणास्तव त्याने मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला, परंतु तो एकदिवसीय मालिकेत भाग घेण्यासाठी भारतात परतणार आहे.
Another Aussie heading home after strange selection snub as desperate plan to "find runs" revealed >> https://t.co/UEG2nU9MlY pic.twitter.com/xJoX3EEZEp
— Fox Cricket (@FoxCricket) February 22, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)