ICC Test Rankings: ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लबुशेन हा कसोटीतील नंबर-1 फलंदाज ठरला आहे. आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीत तो पहिल्या स्थानावर आहे. यासह इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटचा कसोटीतील नंबर-1 फलंदाज म्हणून राजवट संपुष्टात आली आहे. रूट आता चौथ्या क्रमांकावर आला आहे. त्याचवेळी स्टीव्ह स्मिथ दुसऱ्या स्थानावर आहे. टॉप-10 मध्ये फक्त दोन भारतीय फलंदाज आहेत. ऋषभ पंत पाचव्या तर रोहित शर्मा नवव्या स्थानावर आहे. विराट कोहलीला ताज्या क्रमवारीत एका स्थानाचा फायदा झाला असला तरी तो नव्या जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या लबुशेनपेक्षा खूपच मागे आहे.
👑 A new No.1 👑
Australian star scales the summit in the @MRFWorldwide ICC Men's Test Player Rankings for batters 👏
Details 👇 https://t.co/UdpARWgSHM
— ICC (@ICC) December 7, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)