इंग्लंडचा टेस्ट टीमचा कर्णधार बेन स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने सोमवारी ही घोषणा केली. स्टोक्स मंगळवारी त्याच्या वनडे कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळणार आहे. मंगळवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध इंग्लंड तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळणार आहे. हा सामना डरहममध्ये खेळवला जाणार आहे. यानंतर स्टोक्स वनडेला अलविदा करेल. त्याने स्वतः सोशल मीडियावर ही माहिती दिली. यानंतर स्टोक्स कसोटी आणि टी-20 सामने खेळत राहणार आहे. यंदा ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकातही त्याचा इंग्लंड संघात समावेश होऊ शकतो. स्टोक्स हा कसोटीत इंग्लंडचा कर्णधार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)