WPL 2024: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) महिला प्रीमियर लीग (WPL) च्या आगामी हंगामाच्या तयारीचा भाग म्हणून 8 सदस्यीय समितीची घोषणा केली आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांची या समितीचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय समितीमध्ये समाविष्ट असलेल्या इतर सर्वांमध्ये केवळ एका महिलेला स्थान मिळाले आहे. गतवर्षी खेलो इंडिया महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्रानंतर मिळालेले यश लक्षात घेऊन ही समिती येत्या दुसऱ्या सत्रात अधिक यशस्वी करण्यासाठी काम करेल. दरम्यान, महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सत्रासाठी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया 9 डिसेंबर रोजी होणार आहे. आगामी लिलावात एकूण 165 खेळाडूंची नावे नोंदवण्यात आली आहेत. या यादीत 104 भारतीय महिला खेळाडू आणि 61 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. यातील 15 खेळाडू सहयोगी देशांचे आहेत. या यादीत एकूण 56 कॅप्ड खेळाडू आणि 109 अनकॅप्ड खेळाडू आहेत. सर्व पाच संघांसाठी मिळून जास्तीत जास्त 30 स्लॉट उपलब्ध आहेत. (हे देखील वाचा: U-19 Asia Cup 2023 मध्ये IND vs AFG आमनेसामने, कधी अन् कुठे पाहणार विनामूल्य सामना? एका किल्क वर घ्या जाणून)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)