Pakistan National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team 2nd Test 2024 Day 3: पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ (Pakistan National Cricket Team) विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (Bangladesh National Cricket Team) यांच्यात आज म्हणजेच 1 सप्टेंबर रोजी दुसऱ्या कसोटी सामन्याचा तिसरा दिवस खेळला जात आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानचा संघ 274 धावांवर गारद झाला होता. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बांगलादेशने एकही विकेट न गमावता 10 धावा केल्या होत्या. दरम्यान, बांगलादेशसाठी तिसऱ्या दिवसाची सुरुवात काही खास नव्हती. पाहुण्या संघाचे निम्मे खेळाडू पहिल्या सत्रातच बाद झाले. बांगलादेशचा पहिला डाव 78.4 षटकांत 262 धावांवर आटोपला. बांगलादेशकडून लिटन दासने शतकी खेळी खेळली. बांगलादेशकडून लिटन दासने सर्वाधिक 138 धावा केल्या. लिटन दासशिवाय मेहदी हसन मिराजने 78 धावा केल्या. शादमान इस्लाम 10 धावा केल्यानंतर, झाकीर हसन 1 धावा केल्यानंतर, कर्णधार नझमुल हुसेन शांतो 4 धावा केल्यानंतर, मोमिनुल हक 1 धावा केल्यानंतर, मुशफिकर रहीम 3 धावा केल्यानंतर आणि शकीब अल हसन 2 धावा करून बाद झाला. पाकिस्तानकडून खुर्रम शहजादने पहिल्या डावात सर्वाधिक 6 बळी घेतले. याशिवाय मीर हमजाने 2 बळी घेतले.
.@SalmanAliAgha1 gets the last two wickets ☄️
Bangladesh are all out for 262 as Pakistan earn a 12 runs lead 🏏#PAKvBAN | #TestOnHai pic.twitter.com/YPRVEz9tzV
— Pakistan Cricket (@TheRealPCB) September 1, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)