भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू आहे. हा सामना भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. हा सामना जिंकून टीम इंडियाला कसोटी मालिका आपल्या नावावर करायची आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान मिळवायचे आहे. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर या सामन्यात सिराजला वगळता मोहम्मद शमीला पुन्हा संघात स्थान देण्यात आले आहे. दरम्यान, प्रथम फलंदांजी करताना ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का लागला आहे. कर्णधार स्टीव स्मिथ नंतर शमीने हँड्सकॉम्बला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. ऑस्ट्रेलियाचा स्कोर 170/4

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)